पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी | Pruthviche Manogat Nibandh Marathi | पृथ्वी बोलू लागली तर निबंध

Pruthviche Manogat Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात आपण पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी | Pruthviche Manogat Nibandh Marathi

नमस्कार मित्रांनो ! मी, पृथ्वी आहे. आज मी तुम्हाला माझे मनोगत सांगणार आहे. होय, मी पृथ्वी बोलत आहे. माझ्या भूमीवर मानव आणि प्राणी राहतात, जे मला पृथ्वी माता म्हणतात. तुम्हाला प्रत्येक प्रकारे मदत करण्याची इच्छा आहे.

लाखो प्रजाती आणि प्राणी माझ्या जमिनीवर एकत्र राहतात आणि माझा आदर आणि सन्मान करतात हे पाहून मला खूप आनंद होतो.

👉पुस्तकाचे मनोगत निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈 

तुम्ही सर्व मनुष्य, प्राणी, झाडे सर्व काही माझ्यात सामावलेले आहे त्यामुळे मीही सर्व प्राणिमात्रांना माझ्या मुलाप्रमाणे मानून त्यांची काळजी घेते. तुम्हाला आनंदी पाहून मलाही आनंद होत असतो.

मला ‘निळा ग्रह’ असेही म्हणतात. मला माझ्या निर्मिती बद्दल अधिक काही आठवत नाही.Pruthviche Manogat Nibandh Marathi

स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मला जवळपास २४ तास लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात यालाच तुम्ही एक वर्ष म्हणता.

माझ्यात पाण्याचे प्रमाण ७१% इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे.

 पृथ्वी बोलू लागली तर निबंध

माझ्या सपाट आणि सुपीक जमिनीचा वापर करून शेतकरी शेती करतात व शेतात पिके घेतात. शेतकरी माझ्या जमिनीवर अनेक प्रकारचे धान्य पेरतो आणि झाडे लावतो. हे पाहून मला खूप आनंद होतो.

मी माझ्यात सामावलेल्या सर्वांना समान माझ्या लेकरां प्रमाणेच समजते व मी मनुष्याला नुकसान होऊ देत नाही.(पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी)

परंतु आज माझ्यावर जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनि प्रदूषण आणि भूमी प्रदूषण झालेले मला पहायला मिळते व त्यामुळे मला हानी पोहचते. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे.

दिवसेंदिवस वाढणारे उद्योग आणि वाहने यामुळे वायू प्रदुषण होत आहे. वाहनांची वाढती संख्या त्यामुळे धुराचे प्रमाणही वाढत आहे. कारखाने, वाहने यांमधून निघणाऱ्या धुरामुळे वातावरण अत्यंत प्रदूषित होत आहे.

झाडे, वनस्पती आणि सर्व सजीवांचे जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. कचरा, उद्योग किंवा कारखान्यांतील कचरा इत्यादी कचरा नद्यामधे मिसळल्याने पाणी प्रदूषित होऊन त्यातून भयंकर रोगराई निर्माण होते.

हे जलप्रदूषण हे केवळ मानवांसाठीच नव्‍हे तर इतर जीवांसाठीसुध्दा घातक आहे. कारखान्याचे पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडल्याने त्यामुळे पाणी प्रदूषण होते.

👉पुस्तकाचे मनोगत निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈 

कारखान्यांमधील कचरा नद्या, जलाशय, तलाव इत्यादींमध्ये टाकल्याने पाणी दूषित होते. असे खराब पाणी तुमच्या शरीरात पोहोचते आणि गंभीर आजारांना कारणीभूत ठरते.

Pruthviche Manogat Nibandh Marathi

तुमच्या भावी पिढ्यांना स्वच्छ वातावरण द्यायचे असेल, तर आतापासूनच प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.

अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जातात, स्वचछता अभियान आयोजित केले जातात, रासायनिक खतांच्‍या ऐवजी जैविक खतांचा वापर करणे हे पाहून मला खूप आनंद होतो.

प्रत्येक प्राणी माझ्याकडे आई म्हणून आदराने पाहतो. ते मला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत.म्हणूनच मी नेहमीच प्रत्येकाला एकच संदेश देते की माझी काळजी घ्या त्याने तुमचे जीवन आपोआप आनंदी.

त्यामुळे माझ्यावर आनंदात राहायचे असेल तर माझे रक्षा प्रत्येक मनुष्याने करावी असे मला वाटते.

तर मित्रांनो तुम्हाला “पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी | Pruthviche Manogat Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button