Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी या हा निबंध माहिती पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते.
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले. धारवाड येथे शाहू महाराजांनी शिक्षण घेतले.Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi
२ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांना राजर्षी होण्याचे भाग्य लाभले.
👉लोकमान्य टिळक माहिती मराठी येथे क्लिक करा👈
१ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे व राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.
राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
सर फ्रेझर सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले. व्यक्तिमत्त्व विकसित होण्यासाठी अभ्यास व शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान खूप महत्वपूर्ण होते.
स्त्री शिक्षणावर त्यांनी भर दिला. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी राजाज्ञा काढली. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला.
प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण हे खूप महत्वाचे असते. शिक्षणाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात असलेली गरज समजून घेतली पाहिजे.
राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठया प्रमणावर काम केले. रयतेची प्रागती साधण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे राजर्षी शाहू महाराज, यांनी हेरले होते.
त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. राजर्षी शाहू महाराज हे थोर समाजसुधारक होते. अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत त्यांनी बंद केली. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
समाज परिवर्तन घडवणे हा त्यांच्या कार्याचा उद्देश होता. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले व त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यावर विषेश भर दिला.
अनेक समाजपयोगी कार्ये त्यांनी केली. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराजांनी शेती व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले.
शाहू महाराजांनी त्यांच्या कारकीर्दीत कृषि विकासाकडेसुद्धा लक्ष दिले. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांनी त्यांची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली.
Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi
पुढे जाऊन दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. त्यांनी १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.
कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे.
हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कोल्हापूर संस्थानात ६ जुलै १९०२ रोजी मागासवर्गीयांना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.(राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी)
१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत ही पद्धत बंद पाडली.
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्याबरोबरच कला, क्रिडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.
शाहू महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला.
त्यामध्ये त्यांनी अनेक सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराजांनी शेती व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले. रोजगार मिळावा म्हणून त्यांनी १९०६ मध्ये विणकाम व स्पिनिंग मिल सुरू केली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा