आदर्श माता राजमाता जिजाऊ निबंध | Rajmata Jijau Marathi Nibandh | जिजाऊ माता माहिती मराठी

Rajmata Jijau Marathi Nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात “राजमाता जिजाऊ” निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

आदर्श माता राजमाता जिजाऊ निबंध मराठी | Rajmata Jijau Marathi Nibandh

 

राजमाता जिजाऊ या महान देशभक्त होत्या त्यांच्या हृदयात देशप्रेमाची भावना धगधगत होती. हिंदू राज्याच्या स्थापनेमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राजमाता जिजाऊ त्यांच्या शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांना एक शूर, महान, कुशल प्रशासक बनण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांच्या कल्याणासाठी समर्पित राहण्याची शिकवण दिली.

👉स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

त्यांना जिजाई, जिजाऊ, राजमाता जिजाबाई या नावानेही ओळखले जात असे. त्यांचे संपूर्ण जीवन धैर्य आणि त्यागाने भरलेले होते.(राजमाता जिजाऊ निबंध मराठी)

राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव तेथे झाला.

वडिलांचे नाव लखुजी जाधवराव होते. राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. लहान वयातच वेरूळ गावातील शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला. शहाजी राजे भोसले हे एक शूर योद्धा होते.

“राजमाता जिजाऊ” निबंध मराठी

त्या या अतिशय हुशार महिला होत्या. त्यांनी मराठा साम्राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली व त्याचा पाया मजबूत करण्यामध्ये खूप मोठे योगदान दिले.

कधीही हार न मानता त्यांनी धैर्याने जीवनातील अनेक संकटांचा सामना केला व कधीही धीर सोडला नाही. जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले.

त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवाजी महाराज पुढे लोकांचे रक्षणकर्ते महान, शूर, निर्भय योद्धा झाले. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवरायांच्या आई तशाच त्यांच्या मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणा होत्या. त्या अतिशय हुशार होत्या, त्यांनी मराठा साम्राज्यासाठी असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे स्वराज्यास बळकटी मिळाली. आयुष्यातील सर्व त्रास विसरून ‘जिजाबाईंनी’ आपल्या मुलाला शिवाजी महाराजांना असे शिक्षण दिले, असे संस्कार दिले, ज्यामुळे त्यांचा मुलगा स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगू लागला.

छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊ यांच्यावर होती. संयम, शौर्य या गुणांचा विकास होण्यासाठी रामायण आणि महाभारताच्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली.

लहान वयातच आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिंदू साम्राज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाना अशी शिकवण दिली, असे संस्कार दिले, ज्यामुळे राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली.

राजमाता जिजाऊंनी रामायण आणि महाभारताच्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. त्या राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.

जिजाऊ माता माहिती मराठी

छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली मराठा स्वातंत्र्याचा पाया रचणारे थोर मराठा शासक बनले. राजमाता जिजाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांचा कल्याणासाठी समर्पित केले होते.

त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी पहिली.Rajmata Jijau Marathi Nibandh

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी १७ जून १६७४ रोजी त्यांचे निधन झाले. आजही त्यांचे वीर माता आणि राष्ट्रमाता म्हणून स्मरण केले जाते. धैर्य, त्याग यांनी राजमाता जिजाऊ यांचे संपूर्ण जीवन परिपूर्ण होते. त्या ध्येय साध्य करण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहिल्या. राजमाता जिजाऊ ज्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे.

पुस्तके

 

  • जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री – मेधा टिळेकर
  • जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
  • जिजाई : मंदा खापरे ट
  • गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
चित्रपट
  • राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक – यशवंत भालकर)

तर मित्रांनो तुम्हाला “राजमाता जिजाऊ निबंध मराठी | Rajmata Jijau Marathi Nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ राजमाता जिजाऊ निबंध मराठी आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button