Rastriy Ekatmata Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय एकात्मता या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी | Rastriy Ekatmata Nibandh Marathi
भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. आपल्या देशात विविध जाती, धर्माचे लोक आनंदात एकत्रित राहतात.
आपल्या देशात सर्व सण, उस्तव मोठ्या आनंदात मिळून मिसळून साजरे केले जातात.
👉 तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध येथे क्लिक करा👈
राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता असणे आवश्यक आहे.विविधतेने भरलेल्या आपल्या देशात एकता टिकवणे अत्यंत गरजेचे आहे.
राष्ट्रीय एकात्मता हाच मजबूत राष्ट्राचा पाया आहे. देशाच्या सुव्यवस्थेसाठी राष्ट्रीय एकात्मता अंत्यंत गरजेची असते. एकता हे एक शस्त्र म्हणून काम करते.
एकता ही राष्ट्राची शक्ती असते. देशाच्या प्रगतीसाठी एकता खुप महत्वाची असते.Rastriy Ekatmata Nibandh Marathi
आपल्या भारत देशात लोकशाही शासन आहे. एक राष्ट्रध्वज, एक राष्ट्रीय गीत, एक राष्ट्रीय चलन आणि एक केंद्र सरकार आहे.
राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी
वेगवेगळ्या कार्यक्रमातून लोकांमध्ये एकता वाढवण्याचा संदेश दिला जाऊ शकतो. आपल्या देशाचा अभिमान आणि प्रगतीला बाधा येणारी कृत्ये यांना आपण अटकाव घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
राष्ट्राला मजबूत बनवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता महत्वाची असते. ज्या राष्ट्राची एकता मजबूत असते ते राष्ट्रसुद्धा मजबूत बनते. जेव्हा आपली राष्ट्रीय एकता कमजोर पडते तेव्हा इतर त्याचा फायदा घेतात.
आपण देशातील नियमांचे पालन केले तर आपली राष्ट्रीय एकात्मता युगानुयुगे टिकून राहण्यासाठी मदत होइल.
👉 तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध येथे क्लिक करा👈
आपण नेहमीच एकच राहू हा विश्वास आपली राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्यास मदत करेल.
Rastriy Ekatmata Nibandh Marathi
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी त्यांचे जीवनात मेहेनत घेतली.
दरवर्षी ३१ ऑक्टोंबर हा दिवस “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा केला जातो. ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते.
त्यांनी राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेले योगदान खूप मोठे होते त्याविषयी जनजागृती करणे हा यामागील उद्देश.
सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जातात.
सरकारने २०१४ साली सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याचा स्मरणार्थ ‘राष्ट्रीय एकता दिवस’ (National Unity Day) साजरा करण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय एकात्मता जपणे हे राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.
आपल्या राष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपल्या एकतेमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टींना आपण अटकाव केला पाहिजे.”Rastriy Ekatmata Nibandh Marathi”
एकतेमध्ये खूप ताकत असते. आपण सर्व देशवासियांनी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व समजून घेऊन ती जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
राष्ट्रीय एकात्मता का महत्वाची आहे याबद्दल शाळा, महाविद्यालयामधील मुलांना माहिती दिली पाहिजे. वैयक्तिकरित्या देशाची एकात्मता मजबूत होईल असे प्रयत्न आपण करत राहणे आवश्यक आहे
तर मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी | Rastriy Ekatmata Nibandh Marathi हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ईमेल – pravinynsankpal@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद