Sainikanchi Jivan Shaili Nibandh In Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी या विषयावर निबंध पाहणार आहोत.
या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी | Sainikanchi Jivan Shaili Nibandh In Marathi
प्रत्येकाची स्वप्ने ही वेगळी असतात. कोणाला डॉक्टर बनायचे असते तर कोणाला शास्त्रज्ञ, कोणाला इंजिनिअर बनायचे असते तर कोणाला सैनिक. मलाही लहानपणापासून देशासाठी काहीतरी करायचे होते.
माझ्या आजोबांनीही सैन्यात सेवा करताना आपले संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित केले. अशा प्रकारे देशसेवेसाठी समर्पणाची भावना मला आधीपासूनच मिळाली. सैनिकांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतलेले कष्ट मेहनत व त्यांचे देशप्रेम पाहून मलाही त्यांच्यासारखे बनायचे होते. सैनिकाचे जीवन सामान्य जीवनापेक्षा खूप वेगळे असते.
शालेय जीवनापासून मला ही आवड निर्माण झाली. शाळेमध्ये असताना २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या कार्यक्रमांना आमच्या गावातील सैनिक आम्हाला मार्गदर्शन करायचे.
मला एक गोष्ट समजली होती, जर आपल्याला सैनिक बनायचे असेल तर खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. मी परीक्षांचा, मैदानातील परीक्षांचा सराव केला.(सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी)
👉माझे गाव मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता जेव्हा मी भारतीय सैन्यात भरती झालो होतो. माझ्या प्रयत्नांना यश मिळाले होते आणि मलाही खूप आनंद झाला होता. भारतीय लष्करात जवान म्हणून रूजू झालो. भारत मातेचे रक्षण करण्याची संधी मिळालेल्या हजारो सैनिकांपैकी मी एक आहे याचा अभिमान वाटत होता.
सैन्यात भरती झाल्यानंतर मला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. प्रशिक्षण शिबिरात माझ्याशिवाय इतर काही जण माझ्यासोबत होते. आमच्या सर्वांमध्ये एक नवी उमेद, उत्साह आणि देशसेवेची तीव्र भावना होती. प्रशिक्षण घेत असताना नवीन मित्रही झाले. आम्ही सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्यांप्रमाणे एकत्र राहिलो.
सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी
मला प्रशिक्षण घेताना खूप साऱ्या नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रत्येकाकडून त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे व मी त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत होतो. प्रशिक्षणा दरम्यान मी सर्व नियमांचे पालन केले. प्रशिक्षण घेत असताना सैनिक बनणे ही गोष्ट किती कठीण असते हे मला समजले.
जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीने आम्ही सर्व अडचणींवर मात केली. कधी-कधी मला घरची खूप आठवण यायची. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळा सीमारेषेवर माझी नेमणूक झाली.Sainikanchi Jivan Shaili Nibandh In Marathi
काही भागात थंडीचे प्रमाण जास्त असते, सामान्य माणूस घराबाहेर पडत नाहीत पण आम्ही कोणतीही पर्वा न करता जबाबदारी चोख पार पाडतो. कठीण परिस्थितीत मी माझी पावले न हलवत कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहतो. मला पदके मिळतात जी माझ्या शौर्याचा पुरस्कार आहे. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता मी लढलो याचा मला अभिमान वाटतो.
👉माझे गाव मराठी निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली होती व मला माझे काम करताना खूप आनंद होत होता. देशाचा एक दक्ष सैनिक म्हणून मी माझे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतो.
Sainikanchi Jivan Shaili Nibandh In Marathi
सीमेवर देशाची सेवा करत असताना घरचीही खूप आठवण येत असते. आईवडिलांची तब्बेत ठीक असेल ना? ते काळजी घेत असतील ना असे अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात. पण मी हे सर्व सोडून देशाला सर्वोच्च ठेवतो, म्हणूनच मला सैनिक म्हणतात.
दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन नुकताच मी घरी परतलो आहे लोकांचा आदर आणि प्रेम मला बळ देते. वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद हसतमुखाने संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देतात.
काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी आल्यावर मला माझ्या देशाची आणि नागरिकांची काळजी वाटते. सैनिक असणे हा एक सन्मान आहे. माझ्या भारत मातेचे रक्षण करण्याची जी संधी मला मिळाली आहे त्याबद्दल मी नेहमीच देवाचे आभार मानतो.
तर मित्रांनो तुम्हाला “सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी | Sainikanchi Jivan Shaili Nibandh In Marathi ” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद