2023 मा. शरद पवार निबंध मराठी | Sharad Pawar Nibandh in Marathi

Sharad Pawar Nibandh in Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात मा. शरद पवार निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

त्यांचे सुरुवातीचे जीवन, राजकीय कारकीर्द, त्यांना मिळालेले पुरस्कार याबद्दल माहिती पहाणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

मा. शरद पवार निबंध मराठी | Sharad Pawar Nibandh in Marathi

 

मा. शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी  पुणे जिल्ह्यामधील बारामती येथे झाला. यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे.

त्यांच्या आई १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. शरद पवार यांचा १ ऑगस्ट १९६७ रोजी प्रतिभा शिंदे यांच्याशी विवाह झाला.

👉स्वच्छता ही सेवा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈 

मा.शरद पवार यांनी पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये (BMCC) शिक्षण घेतले.

त्यांना १९६६ साली युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे.“मा. शरद पवार निबंध मराठी”

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते आदर्श मानतात. त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभामधे त्यांनी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण हे शरद पवार यांचे राजकीय गुरू मानले जातात.

मा. शरद पवार निबंध मराठी

त्यांनी २००५ ते २००८ या कालावधीमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. क्रीडा क्षेत्रामध्येसुद्धा शरद पवार यांनी प्रचंड योगदान दिले. क्रिकेट हे देखील त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे.

👉स्वच्छता ही सेवा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈 

२०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ते अध्यक्ष होते. २००१ ते ते २०१० पर्यंत त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी कार्य केले.

गोवा मुक्ती चळवळीच्या समर्थनार्थ १९५६  मध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात त्यांचा सक्रिय सहभाग ही त्यांची राजकारणातील पहिली कृती होती. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.

बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन शरद पवार पहिल्यांदा १९६७ महाराष्ट्र विधानसभेत मध्ये पोहोचले. सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले.Sharad Pawar Nibandh in Marathi

त्यांनी १९७८ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आणि जनता पक्षासोबत महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन केले आणि ते पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री झाले.

१८ जुलै१९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाले. सत्तेत परतल्यानंतर इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केले.

Sharad Pawar Nibandh in Marathi

मा.शरद पवार १९८३ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (समाजवादी) चे अध्यक्ष बनले आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवून निवडणूक जिंकली.

१९८५ मध्ये विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राज्याच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकसभेच्या लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. ते १९८७ साली काँग्रेस पक्षात परतले. 

जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय अर्थमंत्री केले व त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची निवड केली.

मा. शरद पवार यांनी २६ जून १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. १९८९ मधे झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी २८ जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या.

फेब १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने कडवी झुंज देवून एकूण २८८ जागांपैकी १४१ जागा जिंकल्या.

१२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने मा. शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. २०१२ मध्ये तरुणांना संधी मिळावी म्हणून  २०१४ ची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली.

आतापर्यंत त्यांनी लोकहिताची खूप कामे केली आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या.

केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या.

लोकांच्या विकासासाठी सतत धडपडणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे मा. शरद पवार साहेब सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी आजही प्रयत्न करत असल्यामुळे ते आदर्श बनले आहेत.

पुरस्कार

  • पद्मविभूषण – २०१७

महत्वाचे

  • मुंबई क्रिकेट असोसिएशन
  • महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन
  • महाराष्ट्र खो-खो असोसिएशन
  • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष

तर मित्रांनो तुम्हाला “मा. शरद पवार यांची माहिती | Sharad pawar information in marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ मा. शरद पवार यांची माहिती आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button