शिक्षण ऑनलाइन ऑफलाइन निबंध मराठी | Shikshan Online Offline Nibandh Marathi

Shikshan Online Offline Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात शिक्षण ऑनलाइन ऑफलाइन निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

शिक्षण ऑनलाइन ऑफलाइन निबंध मराठी | Shikshan Online Offline Nibandh Marathi

 

 

कोरोना संकटामुळे आपल्या सर्वांचेच आयुष्य अस्थिर झालेले होते. कोरोनासंकटाने सर्वानाच ग्रासून टाकले होते.

आपल्याला माहित आहे की हा डिजिटल काळ आहे जिथे विद्यार्थ्यांसाठी वर्ग, माहिती डिजिटल पद्धतीने दिली जाते. प्राथमिक ते उच्च शिक्षण संस्थांनी ऑनलाइन वर्गांच्या मदतीने नवीन आदर्श निर्माण केले आहेत.

प्रत्येकजण शिक्षणाचे हे नवीन माध्यम स्वीकारत आहे. ऑनलाइन शिक्षणाला ई-लर्निंग असेही म्हटले जाते. अनेक शाळा, संस्था आणि महाविद्यालये ऑनलाइन शिक्षणाचा अवलंब करत आहेत.

👉स्वच्छ भारत अभियान निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

शिक्षण हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे व ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून मिळवू शकतो.

कोरोना व्हायरस या संकटाचा सगळ्यात मोठा परिणाम हा शिक्षणावर झाला आहे. कोरोना संकट येण्याच्या आधीचे शिक्षण अतिशय वेगळे होते.

कोरोना काळात खूप मोठे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या सारकरने कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या.

कोरोनाच्या या संकटाचा परिणाम देशातील सगळ्याच क्षेत्रात झाला आहे. कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शिक्षण पद्धतीतमध्येही कमालीचा बदल झाला.

शिक्षण ऑनलाइन ऑफलाइन निबंध मराठी

कोरोना संकटापूर्वी मुले शाळा कॉलेज मधे जाऊन शिक्षण घेत होती परंतु तेच आपल्याला मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट यांचा उपगोय करून ऑनलाईन पद्धतीने घ्यावे लागले. ऑनलाइन शिक्षणामूळे आपल्या वेळेची बचत होते.

शाळा सुरू नसल्यामुळे सर्व मुलांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर केला. गुगल मीट, झूम यांचा वापर करून मुले शिक्षण मिळवू लागली. आजकाल अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया अवलंबत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मुले शिक्षण घेऊ शकतात.

या कठीण कोरोना कालावधीमधे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातुन शिक्षण घेण्यास भाग पडले आणि ते फायदेशीर देखील आहे.

ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हे माध्यम सोयीस्कर वाटत नसेल पण कोरोनासारख्या संकटकाळात आपल्याला नवीन पर्यायांचा विचार करण्यास भाग पाडते.

कोरोना महामारीसारख्या परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात ऑनलाइन शिक्षणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कोरोना महामारीच्या काळात ऑफलाइन शिक्षण देणे अशक्य होते.

डोकेदुखी, कमकुवत दृष्टी अशा अनेक आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. ऑनलाइन क्लासेसमध्ये मोबाईल किंवा लॅपटॉपच्या जास्त वापर झाला तर विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर आणि आरोग्यावर परिणाम होतो.

शिक्षकांना अनेक वेळा नीट समजून घेणे अवघड जाते. समोर बसलेले ऑफलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवू शकतात आणि विषय चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.

Shikshan Online Offline Nibandh Marathi/online shikshan nibandh marathi

त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकवले जाणारे विषय ऑनलाइन शिक्षणाद्वारे कसे शिकता येतील किंवा सर्व विद्यार्थी ऑनलाइन शिकू शकत नाहीत हे शोधणे खूप कठीण होते.

शिक्षक समोर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे शिक्षकांना सोप जाते. विद्यार्थ्याना अभ्यासाचे वातावरण मिळते. शाळेत वेगवेगळे उपक्रम सुद्धा घेतले जातात ज्यांद्वारे विद्यार्थ्यांचा विकास होण्यास मदत होते.

ऑफलाइन शिक्षणामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवादाचा जास्त राहतो.Shikshan Online Offline Nibandh Marathi

ऑफलाइन वर्गामध्ये विद्यार्थी सहजपणे आपल्या शंका विचारू शकतात. ऑफलाइन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला शैक्षणिक वातावरण मिळते.

ऑफलाइन वर्गांमध्ये शिक्षकांशी संवाद साधणे सोपे होते. ऑनलाइन वर्गांमध्ये शिक्षकांशी जास्त इंटरेस्ट होता येत नाही.

तर मित्रांनो तुम्हाला “शिक्षण ऑनलाइन ऑफलाइन निबंध मराठी | Shikshan Online Offline Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ शिक्षण ऑनलाइन ऑफलाइन निबंध मराठी सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button