सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya ugavala nahi tar marathi nibandh

surya ugavala nahi tar marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण सूर्य उगवला नाही तर निबंध मराठीत पाहणार आहोत तरी आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

सूर्य उगवला नाही तर हा निबंध लिहीत असताना सूर्य उगवला नाहीतर काय काय होईल याचा विचार आपण करणार आहोत.

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya ugavala nahi tar marathi nibandh

 

“surya ugavala nahi tar marathi nibandh”:- थंडी संपून उन्हाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती. दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे मी निवांत झोपलो होतो.

रात्री लवकर झोपल्यामुळे सकाळी सकाळी पक्ष्यांचे छान छान आवाज कानावर पडू लागले. आणि पक्ष्यांच्या आवाजांसोबत आईचाही आवाज कानावर पडला. इतका उशीर झोपतात का?

आईचा आवाज ऐकताच मला दचकन जाग आली आणि मी खिडकीतून बाहेर पहिले आणि माझ्या मनात एक कल्पना आली जर सूर्य उगवलाच नाही तर काय होईल ?

सूर्य उगवलाच नाही तर काय होईल ? ही कल्पना मनात आल्याबरोबर माझ्या मनात अनेक विचार घोळू लागले.

सूर्य न उगवल्याने काय फायदे होतील याचा मी विचार करू लागलो. सूर्य उगवला नाही तर किती चांगले होईल ना.
सूर्य न उगवल्याने मला सकाळी लवकर उठावे लागणार नाही.

ऊन्ह नसल्यामुळे रस्त्याने चालत असताना पायाला चटके लागणार नाहीत. सूर्य उगवला नाही तर माझ्या घरातल्यांना कामावर जावे लागणार नाही, घरच्यांना पूर्ण वेळ अराम मिळेल.

सूर्य उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरेल आणि शाळांना सुट्टी देण्यात येईल त्यामुळे मला शाळेत जावे लागणार नाही पूर्ण दिवस मज्जा करता येईल.

परंतु मी पुन्हा विचार करू लागलो की सूर्य न उगवल्याचे फक्त फायदेच आहेत का? तेव्हा मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास सुरवात झाली.’सूर्य उगवला नाही तर निबंध मराठीत’

Surya ugavala nahi tar marathi nibandh

आपल्या आजूबाजूचा निसर्ग, जीवसृष्टीचे पाणपोषण करण्यात सूर्याची मोठी भूमिका असते. सूर्याला आपला जीवनदाताच म्हंटले पाहिजे. सूर्य न उगवण्याचे भरपूर नुकसान आहेत. सूर्य नाही उगवला तर दिवसच नाही होणार.

सूर्य उगवल्यामुळे दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्न होते.

पहाटेची कोंबड्याची बाक आपल्या कानावर पडते. पक्ष्यांचे छान छान आवाज ऐकून छान वाटते.

सूर्य उगवला नाही तर शाळा उघडणार नाहीत आणि मुलांचे मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे नुकसान होऊ शकते.

बाजारपेठा, दुकाने, आत्यावश्यक सेवा, दवाखाने बंद राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल.

सूर्य किरणांमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. काम करण्यास उत्साह निर्माण होतो.

👉पेट्रोल संपले तर निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈  

सूर्य उगवला तरच शेतकरी मोठ्या जोमाने शेती करू शकतो. फळे भाज्या पिकवू शकतो. सूर्य प्रकाश ही शेतीसाठी लागणारी महत्वाची गोष्ट आहे.

सूर्य न उगवल्याने थंडीचे प्रमाण वाढेल. थोडे दिवस आपल्याला खूप छान वाटलं. परंतु नंतर थंडीचे प्रमाण जास्त वाढेल.

वाढत्या थंडीमुळे पाण्याची होणारी वाफ थांबेल व पावसाचे प्रमाण कमी होईल.

सूर्य उगवला नाहीत पूर्ण निसर्गचक्र विस्कळीत होऊन  जाईल आणि त्यामुळे भरपूर प्रमाणात नुकसान होऊ शकते.

शेती मध्ये पिकणारी पिके शेतकरी सूर्यकिरणांअभावी घेऊ शकणार नाही. त्यामुळे आपले व मुक्या प्राण्यांचे खाण्याचे हाल होतील.

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठीत

शेतकरी शेतीतून पिकेच घेऊ शकला नाही तर उपासमारीची वेळ येऊ शकते. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, ऊर्जा देतो.

झाडांची वाढ होण्यासाठी सूर्यकिरण महत्वाची भूमिका बजावत असतात.

आपल्याला जसे अन्न ,वस्त्र, निवारा ह्या गरजा महत्वाच्या वाटतात त्याप्रमाणे सूर्य प्रकाशही तेवढाच गरजेचा आहे.

👉पेट्रोल संपले तर निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈  

सूर्य उगवला तरच आपल्या आजूबाजूचा निसर्ग आभादीत राहील. आपल्या आजूबाजूचे पक्षी प्राणी आपल्या निसर्गाची शोभा वाढवतील. थकून भागून आल्यावर झाडांच्या सावलीत अराम करण्याचे सुख आपल्याला मिळेल. असे अनेक विचार मनात येताच मी स्वतःलाच म्हंटल…सूर्य हा उगवलाच पाहिजे.

जर निसर्गचक्र व्यवस्तीत चालू ठेवायचे असेल तर सूर्य उगवणे गरजेचे. सूर्य उगवला नाही तर ही फक्त कल्पनाच राहू देऊ.

तर मित्रांना तुम्हाला “सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya ugavala nahi tar marathi nibandh हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ सूर्य उगवला नाही तर या निबंधाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल –

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

धन्यवाद

Leave a Comment