स्वच्छ भारत अभियान निबंध | Swachh Bharat Abhiyan Nibandh Marathi

Swachh Bharat Abhiyan Nibandh Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात स्वच्छ भारत अभियान निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

स्वच्छ भारत अभियान निबंध | Swachh Bharat Abhiyan Nibandh Marathi

 

“स्वातंत्र्यापेक्षा स्वछता महत्वाची आहे” महात्मा गांधीजींच्या या विचारातच स्वछता किती महत्वाची आहे हे समजून जाते. महात्मा गांधीजींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न हाच या अभियानामागचा मूळ उद्देश होता.

महात्मा गांधीजी स्वच्छतेला खूप महत्व देत असत. त्यांनी स्वच्छ आणि निरोगी भारताची कल्पना जी कल्पना केली होती ती कल्पना पूर्ण करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतली.

आपला भारत देश हा अतिशय सुंदर आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्या देशात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. जर आपल्या आजूबाजूस स्वछता नसेन तर आपले आरोग्यही नीट राहू शकणार नाही.

👉मतदान जनजागृती निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

स्वच्छ भारत अभियान आपल्या सर्वांना माहीत आहेच. आपल्या देशाच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान आहे.Swachh Bharat Abhiyan Nibandh Marathi

स्वच्छता ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वछ असल्याने खूप साऱ्या आजारांपासून आपल्याला लांब राहत येते.

स्वच्छ भारत अभियान निबंध

स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे, ज्याचा उद्देश रस्ते, रस्ते आणि पायाभूत सुविधा स्वच्छ ठेवणे आणि कचरा स्वच्छ ठेवणे हे आहे जेणेकरून आपला देश स्वच्छ राहावा आणि रोगांचा प्रादुर्भावही कमी व्हावा.

भारत सरकारने सुरू केलेला एक चांगला उपक्रम आहे, ज्या अंतर्गत भारताला स्वच्छ आणि आरोग्यदायी देश बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांनी ०२ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त या मोहिमेची सुरुवात केली होती. संपूर्ण देशाने या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

महात्मा गांधींच्या 145 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2014 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले.

गांधीजी लोकांना नेहमी आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवण्यास सांगत असत.आपल्या देशात २ ऑक्टोबर २०१४ मध्ये स्वछ भारत अभियानाला सुरवात झाली. स्वछ भारत अभियान सुरू करण्यामागचा हेतू खूप छान होता. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात राबविले जाते आहे.

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वच्छतेच्या दृष्टीने २ ऑक्टोबर २०१४ महात्मा गांधी जयंती निमित्त या अभियानाला प्रारंभ केला. या मोहिमेला स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छता अभियान ही आणखी दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.(स्वच्छ भारत अभियान निबंध)

या मोहिमेत स्वच्छतागृहे बांधणे, शौचालय वापरास प्रोत्साहन देणे आणि जनजागृती सुरू करणे, रस्त्यांची स्वच्छता, गावागावांत स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, स्वच्छतेच्या माध्यमातून सर्वांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे, स्वच्छता राखणे आदी बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

Swachh Bharat Abhiyan Nibandh Marathi

स्वच्छ भारत अभियान आज आपल्या संपूर्ण भारतासाठी आवश्यक आहे, ज्या अंतर्गत अनेक कामे केली जात आहेत. आपला देश स्वछ असाव हे स्वप्न मनात ठेवून आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी स्वच्छतेचे महत्व लोकांना समजावून सांगत असत.

👉मतदान जनजागृती निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

गावे स्वच्छ ठेवणे, उघड्यावर शौचास न जाता शौचालयचा वापर करावा, स्वच्छतेविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हीच महत्वाची उद्दिष्ट्ये स्वछ भारत अभियानामागची होती.

स्वच्छतेकडे आपले लक्ष्य न दिल्याने रोगराई जलद गतीने पसरत आहे व त्याचे वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात.

आपण जर आपल्या आजूबाजूचा परिसर स्वछ ठेवला तर आपल्याला निर्मळ व प्रसन्न वाटतेच तशेच स्वच्छतेचे खूप चांगले परिणाम आपल्या आरोग्यावरही होतात.

आपल्या स्वच्छ नद्यांमध्ये कचरा न टाकुण आपण जलप्रदूषण टाळू शकतो व खराब पाण्यामुळे होणाऱ्या आजारापासून वाचू शकतो.

आपल्या देशातील नद्या, शाळा, ऐतिहासिक वास्तू, आपल्या देशाची शोभा वाढवत असतात. अशा ठिकाणी स्वछता राखली जाण्याची जबाबदारी आपण घेऊया.

स्वच्छ भारत अभियानामुळे नागरिकांमध्ये शौचास, स्वच्छता इत्यादींबाबत जनजागृती होत आहे. लोकांचा सहभाग असेल तर एखादी मोहिम यशस्वी होऊ शकते.

सरकारने सुरू केलेली ही अत्यंत महत्त्वाची मोहीम असून या मोहिमेला जनतेचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. जर आपण सर्वांनी स्वच्छ भारत अभियानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवले, तर स्वच्छ भारत देशाचे स्वप्नही साकार होईल.

या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. सर्वांनी एकत्र येऊन असेच प्रयत्न करत राहिल्यास स्वच्छतेचे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.

तर मित्रांनो तुम्हाला “स्वच्छ भारत अभियान निबंध | Swachh Bharat Abhiyan Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ स्वच्छ भारत अभियान निबंध आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

3 thoughts on “स्वच्छ भारत अभियान निबंध | Swachh Bharat Abhiyan Nibandh Marathi”

  1. तुमचे लिहिलेले ब्लॉग पोस्ट खूप छान आणि भरपूर माहिती असते. मला तुमचे ब्लॉग वाचायला खूप आवडतात. Topics खुप छान आहेत.

    Reply

Leave a Comment

close button