वर्षा ऋतू निबंध 2023 | Varsha Ritu Nibandh In Marathi | पावसाळा निबंध मराठी

Varsha Ritu Nibandh In Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात वर्षा ऋतू निबंध या विषयावर भाषण पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

2023 वर्षा ऋतू निबंध | Varsha Ritu Nibandh In Marathi | पावसाळा निबंध मराठी

 

 

उन्हाळा ऋतू मधील कडक उन्ह सहन केल्यानंतर व उकाड्याने बेजार झाल्याने सर्वजण वाट पाहत असतात वर्षा ऋतूची. भारतामधील वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तर उपऋतू सहा – वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.

आपल्या देशातील महत्वाचा ऋतूंमधील पावसाळा हा एक ऋतू. आपल्या देशातील प्रमुख उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या प्रमुख ऋतूंमधील पावसाळा हा एक ऋतू.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाऊसाची ओढ असते. आपल्या देशातील अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. काही ठिकाणी शेतीसाठी पाणी नाही तर काही ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागते. अशा अवघड परिस्थिती मध्ये सर्वजण वाट पाहतात वर्षा ऋतूची.(वर्षा ऋतू निबंध)

👉निसर्ग माझा गुरु निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

उन्हाळ्यातील उन्हामुळे घामाने सर्वजण त्रस्त झालेले असतात. उन्हामुळे घराबाहेर पडणेदेखील नको वाटू लागते. अशा वेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो की हे गर्मीचे वातावरणात कधी संपणार????

हा असा ऋतू आहे जो जवळजवळ सर्वांच्याच आवडीचा असतो कारण यामुळे कडक उन्हानंतर आराम मिळतो.

वर्षा ऋतू निबंध

वर्ष ऋतू हा आल्हादायक व सर्वाना हवा हवासा वाटणारा ऋतू आहे. पांढरे, तपकिरी आणि गडद काळे ढग आकाशात फिरताना दिसतात. पावसाचे थेंब ज्यावेळी जमिनीवर पडतात तेव्हा मातीचा येणारा सुगंध घेतच राहावा असे वाटते. पावसाळ्यात वातावरणात नवा उत्साह पाहायला मिळतो.

जून महिन्यामध्ये वातावरणात आपल्याला बदल दिसू लागतात, आकाश ढगाळ होते व अशा वातावरणात आगमन होते ते वर्षा ऋतूचे. कडाक्याच्या उन्हानंतर जून आणि जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाल्याने लोकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळतो.

पाऊसाच्या सारींचे आगमन होते व उन्हाळ्याला कंटाळलेली लोके घराच्या अंगणात धाव घेतात. हा ऋतू आपल्यासाठी खूप आनंद घेऊन येतो. पावसाळा हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे. पावसातल्या मातीचा वास आपल्या मनात उत्साहाने भरतो, शांतता पसरवतो.”Varsha Ritu Nibandh In Marathi”

वर्षा ऋतूमध्ये आकाश खूप स्वच्छ आणि हलके निळे रंगाचे दिसते तसेच रंगबिरंगी इंद्रधनुष्य तर पहातच राहावा असे वाटते. कडक उन्हामुळे तापलेली जमीन थंड होते. तापमानात घट झाल्यामुळे वातावरण आनंददायी होते.

संपूर्ण वातावरण सुंदर आणि आकर्षक दिसते. कडकडीत उन्हाने सुकून गेलेली डोंगरांवरील झाडे हळू हळू टवटवीत होतात. झाडांवर पुन्हा नवीन पाने येऊ लागतात. नद्या, ओढे, तलाव पाण्याने भरून जातात.

शेतकरी आणि वनस्पतींसाठी हा ऋतू वरदानापेक्षा कमी नाही. हा ऋतू शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचा आहे. आपण जशी पहिल्या वर्षा ऋतूच्या आगमनाची वाट पहात असतो तशीच वाट आपला शेतकरी राजा पाहत असतो.

Varsha Ritu Nibandh In Marathi

पाऊस येताच लोकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळते. त्यावेळी शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो पाहण्यासारखा असतो. पावसाळ्यात उष्णतेपासून दिलासा तर मिळतोच, पण शेतीसाठीही तो वरदान ठरतो.

महिने आणि ऋतू यांची समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात. वर्षा ऋतूत नारळी पौर्णमा,रक्षा बंधन,हरितालिका,गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.

👉निसर्ग माझा गुरु निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈 

पावसाळ्याचे अनेक फायदे आहेत तसेच तोटे आहेत. एकीकडे यामुळे उन्हापासून आराम मिळतो तर दुसरीकडे अनेक संसर्गजन्य आजार पसरण्याचीही भीती असते. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर येतात अशा नैसर्गिक आपत्तींचाही धोका असतो.

जर भरपूर पाऊस झाला तर पूर देखील येतात, ज्यामुळे खूप नुकसान होते. या ऋतूमध्ये रस्त्यांवर खड्डे पडू लागतात, तर कधी अतिवृष्टीमुळे, पुलांवरून पाणी गेल्यामुळे मार्ग बंद होतात.

या ऋतूत अनेक आजारही पसरतात. वर्षा ऋतू मध्ये रोगराई भयंकर वाढते त्यामुळे जुलाब, टायफॉइड आणि पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच आपण आजूबाजूच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे आणि पावसात भिजणे टाळले पाहिजे.(पावसाळा निबंध मराठी)

वर्षा ऋतू मध्ये पूर येतात त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अति पावसामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते परंतु पाऊस पडणेही तितकेच गरजेचे आहे. पावसामुळे निसर्गामध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात. या ऋतूमध्ये वातावरण खूप स्वच्छ, सुंदर असते. वर्षा ऋतूमध्ये लोक पिकनिकला जातात. या काळात पर्यटक वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देण्यासाठी बाहेर पडतात.

आपण सर्वांनी निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपली काळजी घेईल. पाऊस पडणे आवश्यक आहे कारण पावसावर केवळ मानवच नाही तर पृथ्वीवरील वनस्पती, प्राण्यांचे अस्तित्व अवलंबून आहे.

दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून पावसाचे पाणीही साठवले पाहिजे. वृक्षारोपन करून झाडांची संख्या वाढवली पाहिजे. आपण अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत जेणेकरून आपले वातावरण स्वच्छ आणि हिरवेगार राहील.

तर मित्रांनो तुम्हाला “2023 वर्षा ऋतू निबंध | Varsha Ritu Nibandh In Marathi | पावसाळा निबंध मराठी ” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ वर्षा ऋतू निबंध सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button