विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध | vidnyan shap ki vardan marathi nibandh

vidnyan shap ki vardan marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज या लेखात विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

 

विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध | vidnyan shap ki vardan marathi nibandh

 

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. आपल्या जीवनाचे कोणतेही क्षेत्र त्यापासून लांब नाही. विज्ञानाची देणगी अमर्याद आहे. विज्ञानामुळे माणसाला हजारो सुविधा मिळत आहेत.

आपल्याला ज्या काही सुख-सुविधा मिळतात त्या सर्व विज्ञानामुळे आहेत. विज्ञानाच्या प्रगतीचा परिणाम माणसाच्या जीवनावर झालेला दिसत आहे. विज्ञानामुळे माणसाचे संपूर्ण जीवनच बदलून गेले.

आपल्याला ज्या गोष्टी कधीकाळी अशक्य वाटत असत त्या विज्ञानानामुळे शक्य झाल्या आहेत. सर्व काही विज्ञानाची देणगी आहे. विज्ञानामुळे जीवनात सुख-सुविधा वाढत आहेत. मात्र या सुविधेसोबतच माणसाला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत आहे.vidnyan shap ki vardan marathi nibandh

👉स्वच्छता ही सेवा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

विज्ञानाचा उपयोग चांगल्या प्रकारे करणे हे आपल्या हातात आहे.

वीज ही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वीज नसेल तर आपली अनेक कामे अडून राहतात. विज्ञानाने आपल्याला अनेक सुखसोयी दिल्या आहेत.

विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध

कारखाने, यंत्रे चालविण्यासाठी आवश्यक असणारी वीज हे विज्ञानाचे एक अद्भुत वरदान आहे. विज्ञानामुळेच विजेचा शोध लागला.

वाहतूक क्षेत्रात विज्ञानाचे योगदान कमी नाही. ज्यामुळे आपल्याला खूप कमी वेगळाच व कमी मेहनत घेता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य झाले आहे.

माणसाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक दिवस, महिने लागत होती परंतू आता तो प्रवास काही तासांत पूर्ण होत आहे. विमानाच्या शोधाने माणसाला पंख मिळाले आहेत.

विज्ञानामुळे कृषी क्षेत्रातही अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. शेतीच्या कामासाठी हजारो अवजारे तयार केली गेली आहेत, ज्यामुळे वेळेची बचत होते व शेतीमधील कामे करणे खूप सोपे झाले आहे. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या वॉशिंग मशिन, फ्रीज, कुलर, लॅपटॉप, मोबाईल त्यांची निर्मितीही विज्ञानामुळे झाली आहे.

जगाच्या एका कोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची बातमी काही मिनिटांतच आपल्यापर्यंत पोहचत आहे. फोनद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीला आपण सहज पाहू शकतो त्याच्याशी संवाद साधू शकतो.

विविध प्रकारच्या यंत्रांच्या निर्मितीमुळे उत्पादनाचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. विज्ञानामुळे उद्योगक्षेत्रातही क्रांतिकारी बदल घडून आले आहेत.(विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध)

रोज नवनवीन शोध लागत आहेत. नवनवीन वस्तूंची निर्मिती केली जाते आहे. या सर्व गोष्टी विज्ञानाच्या शोधाचा परिणाम आहेत. हे सर्व विज्ञानामुळे शक्य आहे. विमान, रेडिओ, मोटार वाहने हे केवळ विज्ञानाच्या आशीर्वादामुळेच आहे.

विज्ञानामुळे औद्योगिक क्षेत्रातही खूप विकास झाला आहे. नवनवीन यंत्रांचा शोध लागल्यामुळे वेळेची बचत होते.उद्योग, कारखाने यांमुळे लोकांना रोजगार मिळत आहे. कामे सहज आणि सोप्या पद्धतीने करता येणे हे विज्ञानामुळे शक्य आहे.

त्यामुळे विज्ञानाला वरदान म्हणावे नाही तर दुसरे काय म्हणावे?

विज्ञानाचे फायदे आणि तोटे याबद्दल विचार केला तर तर विज्ञानाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचा योग्य वापर केला नाही तर तोटेही पाहायला मिळतात. विज्ञान हे वरदान आहे की शाप हे आपण त्याचा उपयोग कसा करतो यावर अवलंबून आहे

👉स्वच्छता ही सेवा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈 

विज्ञानामुळे अनेक सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत परंतू विज्ञानाचा गैरवापर केल्यास ते अत्यंत विनाशकारी असू शकते. जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीसारख्या शहरांचा विध्वंस ही त्याची उदाहरणे म्हणून समोर येतात.

vidnyan shap ki vardan marathi nibandh

विज्ञानामुळे जिथे माणसाला सुखसोयी आणि सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरीही दुसरीकडे आपल्यासाठी नवीन अडचणीही निर्माण झालेल्या आहेत.

जिथे एकीकडे विज्ञानाने मानवी जीवनात अनेक प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, तर दुसरीकडे त्याचा गैरवापर उदाहरणार्थ अणुबॉम्ब, विषारी वायू इत्यादींमुळे मानवी जीवन धोक्यात आणि असुरक्षित बनले आहे.

सोयीच्या साधनांमुळे माणसाला आळशी बनवले आहे. शिक्षण क्षेत्रातही विज्ञानाचे मोठे योगदान आहे. संगणक, मोबाईल यांच्या मदतीने शिक्षणाशी संबंधित सर्व माहिती आपण मिळवू शकतो.

मानवजातीच्या हितासाठी शस्त्रांचा वापर केला तर ते वरदान ठरेल परंतू त्याचा उपयोग आपण मानवाच्या विनाशासाठी वापर केला तर तो मानवजातीसाठी शाप ठरेल. कोणीही निरक्षर राहू नये यासाठीच विज्ञानाने मोठ्या प्रमाणावर शिक्षणाची साधने उपलब्ध करून दिली आहेत तरीही निरक्षर लोकांची संख्या मोठी आहे.

तर मित्रांनो तुम्हाला “विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध | vidnyan shap ki vardan marathi nibandh” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध सबंधित आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button