वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी | vriksharopan kalachi garaj marathi nibandh

vriksharopan kalachi garaj marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आज आपण वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी | vriksharopan kalachi garaj marathi nibandh

 

निसर्गाचा आणि आपला खूप जवळचा संबंध आहे. निसर्गामधूनच मनुष्याच्या विविध गरजा पूर्ण होतात. मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी निसर्गामधून प्राप्त होतात.

वृक्ष निसर्गाच्या सुंदरतेमध्ये आणखी भर घालतात. वृक्षांमुळे आपल्याला नेहमी फायदेच होतात. निसर्गामधूनच मनुष्याच्या अनेक गरजा पूर्ण होतात. निसर्गातील महत्वाचे म्हणजे वृक्ष. वृक्ष हे निसर्गाचा सर्वात महत्वाचा घटक आहे.

👉झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

आपण वृक्षांचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपले अस्तित्व टिकून राहण्यासाठी वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावत असतात.

आपल्याला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सुंदर निसर्गात वेळ व्यतित करायला नेहमी आवडतो. झाडांमुळे निसर्गाला सौंदर्य प्राप्त होते.

निसर्गात असणारे वृक्ष आपल्याला केवळ सावली देत नाहीत तर त्यांच्यापासून अनके फायदेही होतात. “वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी”

हे वृक्ष कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेतात आपल्याला जीवनावश्यक असणारा ऑक्सिजन प्रदान करतात. ऑक्सिजन आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. मातीची होणारी धूप वृक्षांची संख्या वाढल्याने कमी प्रमाणात होऊ शकते.

आपल्याला निरोगी राहण्यासाठी स्वच्छ हवा मिळणे गरजेचे असते. अनेक प्रदूषणाच्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत आहे. वेगवेगळे वायू हवेत मिसळल्यामुळे आपल्याला स्वछ हवा मिळणे खूप गरजेचे असते. हे वृक्ष हवा स्वछ करण्याचे काम करतात.

झाडांमुळे मिळणारी स्वछ हवा आपल्याला निरोगी ठेवण्यात मदत करते. अनेक झाडांमध्ये औषधी गुणधर्म असतो. औषधी गुणधर्म असणाऱ्या वृक्षांच्या मदतीने अनेक आजारांवर औषधे उपलब्ध होतात. पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण हे वृक्ष निर्माण करतात.

वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी | Vriksharopan kalachi garaj nibandh

जर वृक्षांची संख्या कमी झाली तर?

वृक्षांची संख्या कमी झाली तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

वृक्षांची संख्या कमी होत राहिली तर आपल्याला जागतिक तापमानवाढ, प्रदूषण अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तापमान वाढ झाल्यामुळे अनेक पक्ष्यांचे, प्राणाचे जीवन धोक्यात येऊ शकते.

वृक्षतोड झाल्यामुळे जंगलांचे प्रमाण कमी झाले आहे. तेथील प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. पर्यावरणाचा समतोल नीट राहण्यात वृक्ष महत्वाची भूमिका बजावतात.

👉झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

जर वृक्षांची संख्या कमी झाली तर पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. (vriksharopan kalachi garaj marathi nibandh)

त्यासाठी वृक्षांचे महत्व समजून घेऊन व अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी वृक्षारोपण करणे ही  काळाची गरज बनली आहे. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे.

वृक्षारोपण करून अनेक समस्या आपण दूर करू शकतो. वृक्षारोपण करण्याचे अनके फायदे आपल्याला पाहायला मिळतात. आपण वृक्षारोपण करण्याकडे जास्त भर दिला तर अनेक प्रदूषणाच्या समस्या दूर होतील.

निसर्गचक्र व्यवस्थित ठेवायचे असेल तर वृक्षतोड न करता आपण वृक्षारोपण केले पाहिजे. अलीकडे वृक्षारोपणचे अनेक उपक्रम राबविले जातात त्यामध्ये आपण आपला सहभागी झाले पाहिजे.

वृक्ष लागवड काळाची गरज निबंध | वृक्ष लागवडीचे महत्व निबंध 

आपल्याला शक्य होईल तेवढे वृक्ष आपण लावले पाहिजेत. शाळा, कॉलेजमध्ये भेट देऊन सर्वांना वृक्षारोपण करण्याचे महत्व समजावून दिले तर वृक्षांची संख्या वाढण्यात मदत होईल.

आपण एखाद्या निसर्गरम्य परिसराला किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली तर त्या ठिकाणी एखादे झाड लावू शकतो. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण वृक्ष एकमेकांना देऊ शकतो.

पर्यावरणाविषयी जनजागृती होण्यासाठी  ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण वृक्षारोपण करून आपण कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाणा कमी करून ऑक्सिजन वायूचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत करू शकतो.

वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे त्यामुळे आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही तर त्यांचे संगोपन करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे.

वृक्षारोपण काळाची गरज या निबंधासाठी असेही शीर्षक असू शकतात-

 

  • वृक्ष लागवड काळाची गरज निबंध
  • वृक्ष लागवडीचे महत्व निबंध

तर मित्रांनो तुम्हाला “वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी  हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी …. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button