vrukshavalli amha soyare vanchare nibandh marathi नमस्कार मित्रांनो आज आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध या निबंधासंबंधीत काही मुद्दे या निबंधामधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत.
आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध
vrukshavalli amha soyare vanchare nibandh marathi:- पर्यावरण नेहमीची मनुष्याच्या अनेक गरजा पूर्ण करत आला आहे. आपल्या जीवनामध्ये वृक्षांचे खूप महत्वाचे स्थान आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
संत तुकाराम महाराज यांनी अशा सुंदर शब्दात
निसर्गाशी नाते सांगितले आहे.
आपण जर वृक्षारोपण केले, त्यांचे पालनपोषण केले तर ते वृक्ष आपल्याला खूप काही देत असतात. जिथे वृक्षांची संख्या जास्त प्रमाणात असते तिथली हवा स्वछ व निसर्ग अतिशय सुंदर असतो.
आपल्याला आजूबाजूला असलेली झाडे ही आपल्याला अन्न, आयुर्वेदिक औषधे, फळे, फुले, इंधन अशा अनेक गोष्टी देत असतात.“वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध”
अनके लहान लहान पक्षी प्राणी या झाडांमध्ये विसावा घेतात.
आपल्या आजूबाजूला असलेल्या या वृक्षांमुळे निसर्ग सुंदर होऊन जातो. झाडांमुळे निसर्ग हिरवागार होऊन जातो.
वातावरणातील हवा स्वछ करण्यात वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. वृक्षांची संख्या जास्त असल्यामुळे हवा स्वछ राहण्यास मदत होते.

वृक्षांमुळे आपल्या जीवनातील खूप साऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होते. प्रत्येकाला हिरव्यागार निसर्गामध्ये वेळ व्यतीत करायला आवडतो.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा – मला पंख असते तर
वृक्ष हे आपले मित्रच आहेत. वृक्ष हे पर्यावरण संतुलन नीट राहण्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
वातावरणातील कार्बन डाइऑक्साइड वृक्ष शोषून घेतात व आपल्यासाठी जीवनावश्यक असलेला ऑक्सिजन उपलब्ध करून देतात.
आपल्याला आवश्यक असलेला अक्सिजन हे वृक्षच आपल्यासाठी निर्माण करून देतात.
हे वृक्ष आपल्याला अनके गोष्टी देत असतात. हे वृक्ष आपल्याला अक्सिजन तर देतातच व त्या व्यतिरिक्त वृक्ष आपल्याला फळे फुलेही देतात.
Vrukshavalli amha soyare vanchare marathi nibandh
वातावरणातील हवा स्वछ करण्याचे काम हे वृक्ष आपल्यासाठी करत असतात.
अलीकडे जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवाप्रदूषण अशा प्रकारच्या प्रदूषणांचा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. त्यातील हवा प्रदूषण कमी करण्याचे कार्य वृक्ष करत असतात.
अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा उपयोग प्रकारच्या आजारांवर अनेक प्रकारची औषधे बनवली जातात.
पाणी हे आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचे आहे. पाऊसच पडला नाही तर पाण्याच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागेल.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा – माझा आवडता छंद
पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण हे वृक्ष निर्माण करत असतात.
मातीची होणारी धूप या वृक्षांमुळे कमी होते. वृक्षांपासून मिळणारी फळे फुले विकून काही जण आपला उदरनिर्वाह करतात.(vrukshavalli amha soyare vanchare nibandh marathi)
झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे आपल्याला जागतिक तापमानवाढ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
प्रदूषित हवेमुळे अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार तसेच अनेक वेगवेगळे आजार मनुष्याला होत आहेत.
वेगवेगळ्या इंधन ज्वलनातून, कंपन्यांमधील वेगवेगळे वायू मोठ्या प्रमाणात हवेमध्ये मिसळल्यामुळे हवा प्रदूषण होऊ शकते. आपण जर वृक्षांची संख्या वाढवली तर आपल्याला स्वछ हवा मिळेल.
आपल्या सभोवताली असलेल्या वृक्षांचे महत्व खूप आहे. आपण वृक्षांचे महत्व समजून घेऊन वृक्षतोड थांबवली पाहिजे.
वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमीच होत राहिली तर आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पाऊस न पडल्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी वृक्ष असणे गरजेचे आहे.
वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे सुपीक जमीन नापीक होऊ शकते.
आपण जर आत्तापासूनच वृक्षांच्या संख्येत वाढ केली तर आपल्याला शुद्ध हवेसोबतच आपले अनेक गोष्टी आपल्याला मिळू शकतात.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध
वृक्ष आपल्याला सावली प्रदान करतात, कडक उन्हापासून आपले रक्षण करतात. झाडे स्वतः ऊन वारा, पाऊस सहन करतात व आपल्याला सावली फळे अशा उपयुक्त गोष्टी देतात.
निसर्ग आपल्याला असंख्य अनेक गोष्टी प्रदान करतो मग आपण त्याची परतफेड कशा पद्धतीने करू शकतो?प₹
या वृक्षांचे रक्षण करणे यांची काळजी घेणे करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करण्याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल.
वृक्षांचे संवर्धन व वृक्षारोपण, अशा अनेक कार्यक्रमांचे आपल्याला आयोजन करावे लागेल.(vrukshavalli amha soyare vanchare)
वन मोहस्तव दिनादिवशी शाळांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले तर लहान मुलांनाही वृक्षांचे महत्व समजेन.
आपण फक्त कल्पना करूया की जर हे आपल्या आजूबाजू
चे वृक्ष नसतील तर ?
या गोष्टीची आपण कल्पनापण करू शकत नाही कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्या पर्यावरणावर अवलंबून आहेत.
आपण स्वतः वृक्षांची काळजी घेतली तर, लहान मुले आपल्याकडून प्रेरणा घेतात व वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्न करतील.
आपण अनेक नैसर्गिक ठिकाणी भेटी देत असतो. त्या नैसर्गिक ठिकाणी आपण आणखी लावून तिथे असलेल्या सुंदरतेत आणखी भर घालू शकतो.
वृक्षारोपण करून त्यांना मोठे करताना खूप दिवस लागतात परंतु तेच झाड तोडण्यासाठी काही क्षण पुरेशे असतात.
वृक्ष आपल्यासाठी काय करतात?
- तापमान नियंत्रित ठेवणे
- जीवनावश्यक ऑक्सिजन प्रदान करणे
- पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे
- आजारांवर औषधे उपलब्ध करण्यासाठी
- हवा शुद्ध करणे
तर मित्रांनो तुम्हाला “vrukshavalli amha soyare vanchare marathi nibandh” ( वृक्षवल्ली आम्हा सोयरे )हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल- sankpal7729@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
हे निबंध सुद्धा जरूर वाचा –
-
वाचते होऊया मराठी निबंध