वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध | vrukshavalli amha soyare vanchare marathi nibandh

vrukshavalli amha soyare vanchare marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध

 

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।

या सुंदर शब्दात संत तुकाराम महाराज यांनी निसर्गाशी नाते सांगितले आहे.

पर्यावरण नेहमीची मनुष्याच्या अनेक गरजा पूर्ण करत आला आहे. आपल्या जीवनामध्ये वृक्षांचे खूप महत्वाचे स्थान आहे.

आपण जर वृक्ष लावले, त्याचे संगोपन केले तर ते वृक्ष आपल्याला काही काही देत असतात. जिथे वृक्षांची संख्या जास्त प्रमाणात असते तिथली हवा स्वछ व निसर्ग अतिशय सुंदर असतो.

वृक्ष आपल्याला अन्न, आयुर्वेदिक औषधे, फळे, फुले, इंधन अशा अनेक गोष्टी देत असतात.

अनेक पक्षी या झाडांमध्ये विसावा करतात. झाडांची फळे फुले खाऊन हे पक्षी जगत असतात.

वृक्षांमुळे आपल्या आजूबाजूला असलेला निसर्ग हिरव्यागार होऊन जातो. वृक्ष निसर्गाची शोभा वाढवत असतात.

वृक्ष वातावरण स्वछ ठेवण्यास मदत करतात. आपले पृथ्वीवर अस्तित्व टिकून राहण्यासाठी वृक्ष खूप महत्वाचे आहेत. प्रत्येकाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते.

पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित ठेवण्यात वृक्ष महत्वाची भूमिका निभावत असतात.

👉झाडे लावा झाडे जगवा हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

वृक्ष हे आपले साथीदारच आहेत. वृक्ष वातावरणातील
कार्बन डाइऑक्साइड शोषून घेतात व आपल्यालाझद जीवनावश्यक असलेला ऑक्सिजन उपलब्ध करतात.

आपल्याला श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेला अक्सिजन हेच वृक्ष आपल्याला पुरवतात. अक्सिजन व्यतिरिक्त वृक्षांपासून आपल्याला असंख्य फायदे मिळतात.

vrukshavalli amha soyare vanchare marathi nibandh

वृक्ष आपल्यासाठी हवा स्वछ करण्याचे काम करतात.
मनुष्य सध्या जलप्रदूषण, वायुप्रदूषण, हवाप्रदूषण अशा अनेक प्रदूषणांचा सामना करत आहे. वृक्ष हे प्रदूषण कमी करण्याचे कार्य करत असतात.

औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींपासून अनेक प्रकारच्या आजारांवर औषधे उपलब्ध होतात.

आपले अस्तिव टिकून राहण्यासाठी वृक्ष जेवढे महत्वाचे आहेत पाणीसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. वृक्ष हे पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात.

मोठ्या प्रमाणात होणारी मातीची धूप हे वृक्ष थांबवतात. त्यामुळे शेतकऱ्याला पिके घेण्यास मदत होते.(vrukshavalli amha soyare vanchare)

अलीकडच्या काळात वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे, वाढत्या प्रदूषणामुळे जागतिक तापमानवाढ ही समस्या आपल्या समोर येऊन उभी आहे.

अलीकडच्या काळात हवा प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार व अन्य आजार मनुष्याला होत आहेत.

👉झाडे लावा झाडे जगवा हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

इंधन ज्वलनामुळे, कंपन्यांमधील वेगवेगळ्या वायू हवेत मिसळल्यामुळे हवाप्रदूषण होते आहे. जर हे वृक्ष असतील तर हवेतील हानिकारक वायू शोषून आपल्याला शुद्ध हवा देतील.

आपण वृक्षांचे महत्व समजून घेऊन वृक्षतोड थांबवली नाही तर आपल्याला मोठ्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

काही ठिकाणी दुष्काळ पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याची टंचाई आपल्याला भासू शकते.

वृक्ष तोड होत राहिली तर जंगलाचे प्रमाण कमी होईल. पशु पक्षी आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. जंगले नष्ट झाली तर पक्ष्यांचे जगणे अवघड होऊन जाईल.

आपण जर वृक्षांच्या संख्येत वाढ केली तर आपल्याला शुद्ध हवेसोबतच अनेक गोष्टींचा फायदा होऊ शकतो.

आपल्या आजूबाजूचे वृक्ष आपल्याला सावली प्रदान करतात व आपले कडक उन्हापासून संरक्षण करतात.

वृक्ष स्वतः उन्ह, वारा, पाऊस सहन करतात व आपल्याला सावली, फळे, फुले ददेतात. वृक्ष आपले संरक्षण करत असतात. निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी प्रदान केल्या आहेत. परंतु तरीही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे सुपीक जमीन नापीक होऊ शकते.

vrukshavalli amha soyare vanchare marathi nibandh

वृक्ष हे निसर्गाची शोभा वाढवत असतात. वृक्षांचे सरंक्षण करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचा संकल्प करावा लागेल. अनेक ठिकाणी वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

पर्यावरणाचे व वृक्षांचे महत्व समजण्यासाठी वन मोहस्तव सारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एका बाजूने वृक्ष वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात तर दुसरीकडे वृक्षतोड केली जाते.

जर नुसती कल्पना केली की हे आपल्या आजूबाजूचे वृक्ष नसतील तर ? आपण कल्पनाच करू शकत नाही कारण खूप साऱ्या गोष्टी पर्यावरणावर अवलंबून आहेत.

आपण जर आपल्यापासून वृक्षांचे संरक्षण करण्यास सुरुवात केली तर आपली पुढील पिढीही आपल्याकडून प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करेल.

वृक्षारोपण करून आपण वृक्षांची संख्या वाढवली पाहिजे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणाला आपण भेट देत असेन तर तिथे एखादे वृक्ष लावून तिथल्या सुंदरतेत आणखी भर घालू शकतो.

एखादे वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यासाठी खूप दिवसांचा कालावधी जातो पण तेच वृक्ष तोडण्यासाठी काही क्षण लागतात. आधीच वृक्षांची संख्या कमी होत  आहे त्यामुळे आपल्याला वृक्षारोपण करून वृक्षांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो तुम्हाला “वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ vrukshavalli amha soyare vanchare marathi nibandh निबंधासंबंधीत आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments किंवा email करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.

आजच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे निबंध मराठी….. या लेखा मध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍

आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद

Leave a Comment

close button