zadache mahatva nibandh marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण झाडाचे महत्व निबंध मराठी
या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.
हा निबंध लिहीत असताना आपण झाडांचे फायदे काय आहेत? झाडे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी प्रदान करतात? वृक्षारोपण करणे का गरजेचे आहे? याची माहिती पाहणार आहोत. आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
झाडाचे महत्व निबंध मराठी | zadache mahatva nibandh marathi
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
संत तुकाराम महाराज यांनी अशा सुंदर शब्दात निसर्गाशी नाते सांगितले आहे. अनेक संतानी, समाजसुधारकांनी आपल्याला झाडांचे महत्व सांगितले आहे.(zadache mahatva nibandh marath)
मानवी जीवनात झाडांचे खूप महत्व आहे. झाडे आपल्याला नेहमी मदतच करत असतात. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडे आपल्याला अनेक प्रदान करत असतात.
👉निसर्ग माझा सोबती निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
प्रत्येकाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यतित करायला आवडतो. झाडांमुळे आपल्या आजूबाजूचा निसर्ग हिरवागार होऊन जातो.
झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात व मनुष्य जीवनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वायू प्रदान करतात. मनुष्य अनेक प्रदूषणांच्या समस्यांचा सामना करत आहे. झाडे वातावरणातील प्रदूषित हवा शुद्ध करून स्वच्छ हवा अपल्याला देत असतात.(झाडाचे महत्व निबंध मराठी)
अनेक श्वसनाच्या आजारांपासून झाडे आपल्याला दूर ठेवतात. झाडे निसर्गातील खूप महत्वाचा घटक आहेत.
पाऊस पडला नाही तर आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. झाडे पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करत असतात. झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत नाही.
झाडे आपल्याला प्राणवायू तर देतातच त्यासोबत झाडांपासून मानवाला फळे, पाने, औषधे, लाकूड, प्राणवायू अशा असंख्य गोष्टी मिळत असतात.”zadache mahatva nibandh marathi”
अनेक झाडांमध्ये औषधी गुणधर्म असतो. अशा झाडांचा उपयोग आजारांवर औषधे निर्माण करण्यासाठी केला जातो.
मनुष्याला झाडे निस्वार्थपणे मदत करत असतात. झाडांपासून आपल्याला सावली मिळते. झाडांच्या थंड सावलीत अनेक प्राणी, पक्षी, मनुष्य विसावा घेतात. झाडांपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळे व फुले मिळतात.
झाडे निसर्गाची शोभा वाढवतात. झाडे आपल्याला निरोगी ठेवण्यात मदत करतात. झाडांपासून मिळणाऱ्या फळे, फुले, लाकूड यांच्यापासून अनेकजण उदरनिर्वाह करतात. झाडे जमिनीची धूप कमी करण्यास व वातावरण स्वछ ठेवण्यास मदत करतात. (वृक्षाचे महत्व निबंध मराठी)
वृक्षाचे महत्व मराठी निबंध | Vruksha che mahatva nibandh marathi
वृक्ष हे आपले मित्रच आहेत. वातावरण स्वछ ठेवण्यासाठी झाडे खूप महत्त्वाची आहेत. हवा प्रदूषण कमी करण्याचे कार्य ही झाडे करत असतात. पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित ठेवायचे असेन तर झाडांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. झाडांची संख्या कमी होत असल्याने अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत.
परंतु मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे वने जंगले नष्ट होत आहेत. वृक्षांची संख्या कमी झाल्याने पावसाचे प्रमाणही कमी होऊ शकते.
👉निसर्ग माझा सोबती निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थितीला सामोरे जावे लागते. झाडांची संख्या कमी झाली तर जमिनीची धूप वाढेल. झाडांचे आपल्या जीवनातील महत्व समजून घेऊन आपण वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करण्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत राहिली तर अनके समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागेल.(वृक्षाचे महत्व मराठी निबंध)
झाडे लावून त्यांचे संगोपन करून त्यांना मोठे होण्यासाठी भरपूर कालावधी लागतो त्यामुळे झाडांचे महत्व आपण आपल्या समजून घेणे गरजेचे आहे. आपल्याला निरोगी राहण्यासाठी व आपल्या पुढील पिढीला निरोगी ठेवण्यासाठी वृक्षारोपण करण्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
वृक्षारोपण करणे जितके गरजेचे आहे तितकेच त्यांचे पालनपोषण करणे गरजेचे आहे. आपल्याला आनंदी, निरोगी, सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत. आपल्या आजूबाजूला हिरवळ असणे गरजेचे आहे.“Vruksha che mahatva nibandh marathi”
झाडांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाडांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला शाळांमध्ये तसेच अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून झाडांचे महत्व पटवून दिले पाहिजे. आपण अनेक नैसर्गिक ठिकाणी भेटी देत असतो. या त्या ठिकाणी तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला झाडे लावून तिथल्या सुंदरतेत आणखी भर घालू शकतो.
निसर्गचक्र नीट राहण्यासाठी आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणी झाडे लावणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याचा एक उपाय म्हणजे वृक्षारोपण.
झाडांचे फायदे-
- झाडे हवा शुद्ध करण्याचे काम करतात.
- झाडे आपल्याला सावली देतात.
- पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात.
- तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
- अनके आजारांवर औषधे उपलब्ध होतात.
- जीवनावश्यक प्राणवायू प्रदान करतात.
- झाडे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात
आपल्या पुढील पिढीसाठी आपण एकत्रित येऊन झाडे लावू.
तर मित्रांनो तुम्हाला झाडाचे महत्व निबंध मराठी | zadache mahatva nibandh marathi आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ झाडाचे महत्व निबंध मराठी या निबंधासंबंधित काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
धन्यवाद